
देश-विदेशातील भाकिकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत दररोज हजारो साईभक्त दर्शनासाठी गर्दी करतात. यावेळी भाविकांकडून साईंच्या झोळीत दान टाकले जाते. मात्र, या दानाच्या रकमेमध्ये अपहार झाल्याचा गुन्हा साईबाबा संस्थानने दाखल केला आहे. साईभक्ताने दिलेल्या देणगीपोटी बनाकट पाकती देऊन देणगीदारासह साईबाबा संस्थानची फसकणूक करणाऱया कर्मचाऱयाकर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी माहिती दिली.
दशरथ भगवंत चासकर (रा. मलढोण, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या साईसंस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱयाचे नाव आहे. याप्रकरणी लेखा विभागाचे प्रमुख कैलास सोनाजी खराडे (वय 59, रा. साईबाबा संस्थान हाऊसिंग सोसायटी, शिर्डी) यांनी तक्रार दिली आहे.
दशरथ चासकर याने दि. 31 ऑक्टोबर 2022 ते 13 एप्रिल 2023 यादरम्यान त्याच्याकडे देणगीकरिता प्राप्त झालेल्या 12 हजार 678 रुपये रकमेच्या देणगीची खोटी पावती करून अफरातफर केली आहे.
निनावी पत्रातून प्रकार झाला उघड
याप्रकरणी काही दिकसांपूर्की साईबाबा संस्थानला एक निनावी पत्र प्राप्त झाले. या पत्रात देणगी कक्षात कामावर असलेला कंत्राटी कर्मचारी देणगीदारांना निम्म्या रकमेची बनावट पावती देत असल्याची तक्रार करण्यात आली होती. साईबाबा संस्थानने याबाबत चौकशी केली असता सदर प्रकार उघडकीस आला. देणगी कक्षात कंत्राटी कर्मचारी दशरथ चासकर याने अपहार केल्याचे उघडकीस आल्यानंतर चासकरविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.
आरोपीला आणखी कोणाची साथ
याप्रकरणी आरोपीला अजून कोणाचीतरी साथ असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तकिली आहे. याचबरोबर आत्तापर्यंत आरोपीने किती लोकांना अशा पद्धतीने बनावट पावत्या दिल्या आहेत, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. साईबाबांच्या झोळीत साईभक्त श्रद्धेने दान करतात. त्यामुळे साईभक्त व साईबाबा संस्थानची फसवणूक करणाऱ्यांकर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस आणि प्रशासन याबाबत आगामी काळात काय कारवाई करतात, याकडे साईभक्तांच्या नजरा लागल्या आहेत.



























































