‘हम आपकी सुनेंगे..’ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोफत हेल्पलाइन

कोरोनाकाळात आरोग्य कर्मचारी स्वतःच्या जिवाची पर्वा करता रुग्णसेवेसाठी अहोरात्र धडपडत असतात. या कर्मचाऱयांना जाणवणारा भावनिक मानसिक ताण कमी करण्यासाठीआविष्कार सेंटर फॉर सेल्फ एनरिचमेंटतर्फे मोफत हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या संकटात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट, पॅरामेडिक्स आणि इतर कर्मचाऱयांना जाणवल्यास सहाय्य करण्यासाठी ‘हम आपकी सुनेंगे’ हा हेल्पलाइन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला मीडियामेडिक कम्युनिकेशन्स या हेल्थकेअर कम्युनिकेशन्स एजन्सीचे पाठबळ लाभले आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून कॉल करणाऱया आरोग्य कर्मचाऱयाला समजून घेतले जाईल, त्यांना धीर दिला जाणार असल्याची माहिती आविष्कार सेंटरच्या संचालक डॉ. निर्मला राव यांनी दिली.

‘केअर फॉर कोविड वॉरिअर्स’हे उद्दिष्ट समोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी प्रशिक्षित 80 स्वयंसेवकांची टीम सहाय्य करणार आहे. ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करणाऱयांना ताण जाणवत असल्यास 9172284386 या हेल्पलाइन क्रमांकावर सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत संपर्क साधता येईल. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजरातीसह  10 भाषांमध्ये हेल्पलाइनवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या