बंगळुरूमधील आंदोलनात झळकले ‘आझाद कश्मीर’चे पोस्टर

960

नागरिकत्व कायद्याविरोधात आयोजित केलेल्या संविधान बचाव रॅलीत पाकिस्तान झिंदाबादचे नारे देणाऱ्या अमुल्या या तरुणीच्या सुटकेसाठी आज बंगळुरू येथे काही तरुणांनी आंदोलन केले. या आंदोलनात चक्क आझाद कश्मीरचे पोस्टर्स झळकविण्यात आल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या तरुणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, न्यायालयीन कोठडीत रवानगी

या तरुणांना कोरोना व्हायरस व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरिही हे आंदोलनकर्ते बंगळुरूतील मौर्या चौकात एकत्र आले व त्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात अटक झालेल्यांच्या सुटकेसाठी आंदोलन केले. या आंदोलन कर्त्यांनी अमूल्याच्या सुटकेसाठी नारेबाजी करत तिने काहीच चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे. या आंदोलनातील एका तरुणीच्या हातात ‘आझाद कश्मीर’ लिहलेले पोस्टर देखील होते.

फेब्रुवारी मध्ये बंगळुरूमध्ये CAA, NCR आणि NPR विरोधात संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संबोधन केले. त्यांचे भाषण झाल्यानंतर अमुल्या या तरुणीने सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तेव्हा ओवेसी यांनी धाव घेत अमुल्याकडून माईक खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. सभेच्या आयोजकांनीही तिला अडवण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी खासदार ओवेसी यांनी या घटनेचा निषेध केला. “आयोजकांनी या तरुणीला आंमत्रण द्यायला नको होते. मला हे आधीच माहित असतं तर मी आलोच नसतो. आम्ही हिंदुस्थानी असून आमच्या शत्रू राष्ट्राला कधीच पाठिंबा नव्हता.” हिंदुस्थानला वाचणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या