ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयांत फुकट उपचार बंद, विभागांच्या खासगीकरणानंतर दरवाढीचे ‘इंजेक्शन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील महत्त्वाच्या आरोग्य विभागाचे एकीकडे खासगीकरण सुरू असताना दुसरीकडे राज्यातल्या ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांतील फुकट उपचार महायुती सरकारने बंद करून टाकले आहेत. स्त्राr रुग्णालयातील उपचारही महागल्यामुळे गोरगरीबांचे कंबरडे मोडले आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने 15 जानेवारी 2023 पासून राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत मोफत निःशुल्क सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा मोठा गाजावाजा केला होता. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती. पण आता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘सार्वजनिक आरोग्य विभागाची सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद’ अशा गोंडस नावाखाली शासन परिपत्रक प्रसिद्ध करून त्यामध्ये वैद्यकीय उपाचारांचे सुधारित दर जाहीर करून केस पेपरपासून रक्त चाचण्या, एक्स-रेवर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या सरकारी रुग्णालयांतील मोफत उपचार यापुढे बंद होणार आहेत. त्याचा मोठा फटका गोरगरीब रुग्णांना बसणार आहे.

कुठे दर वाढणार

ग्रामीण भागातील रुग्णालये ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येतात. त्या ठिकाणीच वैद्यकीय उपचारांचे दर वाढणार आहेत. तर मुंबईतील शासकीय रुग्णालये ही वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्या ठिकाणी याचा परिणाम होणार नाही.

  • राज्यात सर्वाधिक ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्राr रुग्णालये, मनोरुग्णालये, आरोग्य उपपेंद्र मिळून तेरा हजारांहून अधिक विविध आरोग्य संस्था आहेत. या सर्व रुग्णालयांत अडीच कोटींहून अधिक रुग्ण महागडे उपचार मोफत मिळणार म्हणून दरवर्षी येतात. मात्र त्यांना आता आर्थिक फटका बसणार आहे.

वाढीव दर पुढीलप्रमाणे

बाह्यरुग्ण नोंदणी (ओपीडी पेपर)- 5 रु., आंतररुग्ण शुल्क(प्रतिदिन)- 10 रु., रक्तचाचण्या – 15 रु., हिमोग्लोबीन चाचणी- 15 रु., एक्स-रे- 30 रु, आयव्हीपी 100 रु., बेरियम सॅलो 30 रु., अल्ट्रा सोनोग्राफी 100 रु., सीटी स्पॅन डोक्याचा 300 रु., सीटी स्पॅन 400 रु, स्पायरोमॅटरी आणि लंग्ज फंक्शन टेस्ट- 50 रु., भूल देऊन केल्या जाणाऱया शस्त्रक्रिया 160 रु., छोटय़ा शस्त्रक्रिया 60 रु., छोटय़ा शस्त्रक्रिया- 30 रु., अतिदक्षता विभाग प्रतिदिन 100 रु.

  • हाडाच्या सांध्यांचे विकार बळावत आहेत. पण महायुती सरकारने जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचे दर थेट चाळीस हजार रुपयांवर नेऊन ठेवले आहेत.