एअर इंडिया एक्सप्रेसने ‘फ्रीडम सेल’ सुरू केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्षांचे औचित्य साधून एअर इंडियाने प्रवाशांना केवळ 1947 रुपयांमध्ये विमानाने प्रवास करण्याची संधी दिली आहे. ही सुविधा प्रवाशांना 15 आंतरराष्ट्रीय आणि 32 देशांतर्गत मार्गांवर मिळेल. त्यात दिल्ली-जयपूर, बंगळुरू-गोवा, दिल्ली-ग्वाल्हेर या मार्गांचाही समावेश आहे. ‘फ्रीडम सेल’ 5 ऑगस्ट 2024 पर्यंत ग्राहकांसाठी खुला होणार आहे. प्रवासी 20 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान प्रवासासाठी बुकिंग करू शकतात. ऑफरचा लाभ घेण्यासाठी 5 ऑगस्टपूर्वी बुकिंग करावे लागेल.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या वेबसाईटवर बुकींग करणाऱया ग्राहकांना एक्सक्लुझिव्ह झिरो-चेक-इन बॅगेज एक्स्प्रेस लाइट भाडय़ाचा लाभही मिळू शकेल. एक्सप्रेस लाइट भाडय़ात, 3 किलो केबिन बॅगेजची प्री-बुकिंग सुविधा उपलब्ध असेल.