ग्रॅण्ट रोडचा फेरारे उड्डाण पूल अवजड वाहनांसाठी बंद!

215

पश्चिम रेल्वेवरील ग्रॅण्ट रोड स्थानकातील ब्रिटिशकालीन (फेरारे) उड्डाण  पुलावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे या फेरारे उड्डाण पुलावरून आता ट्रक आणि बसेसची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे. ग्रॅण्ट रोड रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरारे उड्डाण पुलाची निर्मिती 98 वर्षांपूर्वी 1921 मध्ये झाली होती. मध्य मुंबईत पूर्व आणि पश्चिम वाहतूक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या लोअर परळ (डिलाइल रोड पूल) पुलाच्या तोडकामानंतर उरलेले ग्रॅण्ट रोड येथील फेरारे, महालक्ष्मी रेल्वे स्टेशनचा उड्डाण पूल, मुंबई सेंट्रलचा उड्डाण पूल आणि दादरच्या टिळक उड्डाण पुलाची पुनर्बांधणी होणार आहे. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेने ग्रॅण्ट रोडच्या फेरारे पुलावरील अवजड वाहतूक तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या