जुन्या वादातून केली मित्राची हत्या

पूर्वीच्या वादातून मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना अंधेरी येथे घडली. सुजित हरिवंश सिंग असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सुनील परशुराम कोकाटे याला अंधेरी पोलिसांनी अटक केली. सुनील आणि सुजित या दोन मित्रांत काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला हेता. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात सुनीलने सुजितवर तीक्ष्ण हत्याराने वार केले त्यात  त्याच्या छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना सुजितचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी सुनील कोकाटे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.