पान मसाल्याला नो प्लॅस्टिक पॅकिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने पान मसाल्याच्या पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. कंपन्या आता फक्त प्लॅस्टिकमुक्त कागद, टिन किंवा काचेच्या कंटेनरमध्येच पान मसाला पॅक करून विपू शकतील. पान मसाल्याच्या पॅकेजिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक, पॉलिथीन, पीव्हीसी, पॉलिस्टर वापरता येणार नाही.