
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे 68व्या वर्षी तिसऱयांदा बोहल्यावर चढले. प्रचंड चर्चेत असलेला हा विवाह सोहळा लंडनमध्ये पार पडला. हिंदुस्थानातून ‘भगोडा’ घोषित करण्यात आलेला ललित मोदी या लग्नात खास पाहुणा म्हणून उपस्थित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्थापन केलेल्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ समितीचे सदस्य असलेले साळवे यांना शँपेनचा ग्लास हातात घेऊन ललित मोदी चिअर्स करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या लग्नाचे पह्टो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यावरून तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत.
मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेला मोईन कुरेशीही साळवे यांच्या लग्नात हजर होता. कुरेशी याचे अनेक कत्तलखाने आहेत. तो ईडीच्या रडारवर आहे. कुरेशीच्या जाळ्यात अडकल्याने तीन सीबीआय संचालकांना कारवाईला सामोरे जावे लागलेले आहे.
हाच का भ्रष्टाचाराविरुद्ध प्रहार?
हे पह्टो समोर येताच सोशल मीडियातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला घेरण्यात आले. ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ असा खाक्या दाखवणाऱया मोदींवर नेटकऱयांनी प्रश्नांचा भडीमार केला. ‘नरेंद्र मोदींचे लाडके वकील हरीश साळवे यांच्या लग्नात भगोडा ललित मोदी नाचत आहे. हाच आहे का तुमचा भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर प्रहार’ असा सवाल माजी आयएएस सूर्यप्रताप सिंह यांनी विचारला.
कोण आहे ललित मोदी…
आयपीएलचा माजी चेअरमन असलेला ललित मोदी 425 कोटींचा घोटाळा करून देशातून पसार झाला आहे. 2010मध्ये देश सोडणाऱया ललित मोदीला देशात परत आणण्यात मोदी सरकारला अजूनही यश आलेले नाही. लंडनमध्ये त्याचे वास्तव्य आहे.
काँग्रेसने विचारला सवाल
नीरव मोदी, ललित मोदी यांची नावे घेऊन ‘सगळे मोदी चोर कसे?’ असे विधान केले म्हणून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. हरीश साळवे यांनी राहुल यांच्याविरुद्ध हा खटला लढला होता. आता मोदी सरकारने साळवे यांची वन नेशन वन इलेक्शन समितीत वर्णी लावलीय आणि ललित मोदी थेट साळवेंच्या लग्नात वऱहाडी म्हणून पोहचलाय, असे नमूद करत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रीतेश शहा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

























































