
पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणातून केलेल्या खुनातील फरार असलेल्या आरोपी महिलेला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सकिना ऊर्फ शोभा योगेश भोसले (मूळ रा. गंगापूर, हल्ली रा. वाळूंज, जि. संभाजीनगर) असे तिचे नाव आहे. शीतल भोसले या महिलेचा खून झाला होता.
15 जानेवारी 2021 रोजी रात्री आमच्याविरुद्ध तक्रार का दिली म्हणून रस्त्यात अडवून दत्त्या, नाडय़ा, योगेश्वर काळे, योगेश भोसले, नागेश काळे, सकिना भोसले, बजाज काळे (सर्व रा. वाळूंज, ता. नगर) यांनी सिद्धू, राहुल, प्रिया, सुचिता हरिदास चव्हाण, आशंका काळे यांना जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शीतल भोसलेने भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. मारहाणीत जखमी झालेल्या सिद्धू चव्हाणचा मृत्यू झाल्याने या गुह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दत्त्या, नाडय़ा, योगेश धूर काळे, योगेश भोसले, नागेश काळे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सकिना फरार होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सकिना भिंगार परिसरात आल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सकिनाचा शोध घेऊन तिला पकडले.

























































