प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; सायन्सचा कट ऑफ चढा, आर्टस्लाही पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली असून व्यावसायिक अभ्यासक्रमांपेक्षा पारंपरिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचे नामांकित कॉलेजच्या कट ऑफकरून दिसून आले आहे. इंजिनीयरिंग आणि मेडीकल प्रवेशाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांनी बीएससीला पसंती दिल्याने यंदा बीएससीचा कट ऑफ चार ते पाच टक्क्यांनी चढा राहिला आहे.

बारावीचा निकाल यंदा काढल्याने नव्वदीपार विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. याचा परिणाम सायन्स, आर्टस् आणि कॉमर्सच्या कट ऑफवर दिसून आला. तसेच इंजिनीअरिंग, औषधनिर्माण शास्त्र अशा अभ्यासक्रमांसाठी होणारी सीईटी परीक्षा व राष्ट्रीय पातळीकर होणारी जेईई आणि नीट परीक्षेची शाश्वती नसल्याने विज्ञान शाखेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी यंदा बीएससी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले आहे. कॉमर्सच्या कट ऑफमध्येही अपेक्षेप्रमाणे वाढ पहायला मिळाली आहे. विद्यार्थ्यांची पसंती कला शाखेलाही असून नामांकित कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्यातून आपले प्रवेश निश्चित केल्याने आर्टस् टक्काही काढलेला आहे.

महाविद्यालय        आर्टस्   कॉमर्स      सायन्स

रुईया            95.6    –           87.08

झेवियर्स          92       –           94

मिठीबाई          96       91.40       84.40

एन. एम.          93.8    94.33       91.8

सोमय्या            88.20   88.20       61

विल्सन             93.6    –      64