अकरावी प्रवेशाने डोक्याला ताप आणला

9

सामना प्रतिनिधी, मुंबई

अकरावी प्रवेशासंदर्भात अचानक नियम बदलत असल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या डोक्याला ताप आणला आहे. आधी पहिल्या तीन फेऱ्यांत प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना चौथ्या म्हणजेच शेवटच्या फेरीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या होत्या, पण अचानकपणे हा नियम बदलून आधी प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश आयडीच ब्लॉक करण्यात आले.

संतापलेल्या पालकांनी याविरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतल्यानंतर रात्री उशिरा या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरण्याची मुभा देण्यात आली. अकरावी प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी ७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याची उद्या ४ ऑगस्टपर्यंत शेवटची संधी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या