गडचिरोलीत नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन पोलीस शहीद

980

गडचिरोलीच्या अतिदुर्गम भामरागड तालुक्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक आणि 1 जवान असे 2 जण शहीद झाले आहेत. या चकमकीत तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. कोठी-  कोपशीं आणि होडरी अशा 2 जंगलात ही चकमक झाली. या भागाची दुर्गमता आणि नक्षल्याना असणारे भागाचे ज्ञान बघता काळजीपूर्वक कोंबिंग ऑपरेशन केले जात आहे. कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर भामरागड येथे तैनात करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या चकमकीत गडचिरोली C-60 नक्षलविरोधी दलाच्या शीघ्र कृती दलाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाणे आणि पोलीस जवान किशोर आत्राम यांना वीरमरण आले आहे. त्यांचे मृतदेह हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली मुख्यालयात पाठविण्यात आले आहेत. या चकमकीत राजू पुसाली, गोंगलु ओकसा आणि दासरू कुरसामी हे C60 जवान गंभीर जखमी झाले आहेत. परिसरात अधिक पोलीस कुमक पाठविण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षल्यांनी पोलीस पथकाला घेरण्यासाठी रणनीती आखली होती.

आपली प्रतिक्रिया द्या