गुगल लॉन्च करणार क्रेडिट कार्डच्या आकारा इतका ‘संगणक’ 

927

गुगलने नुकतेच टेक कंपनी ‘आसूस’सोबत पार्टनरशिप केली असून, ते एका सिंगल बोर्ड संगणकावर काम करत आहेत. या संगणकाचं नाव ‘Tinker Board’ असं ठेवण्यात आलं आहे. हा संगणक आकाराने एका क्रेडिट कार्ड इतका असणार असल्याचं बोललं जात आहे. गुगलच्या Tinker Board ला प्रामुख्याने एआय अॅप्स चालविण्यासाठी विकसित केले जात आहे.

जपानमध्ये 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या IoT टेक्नॉलॉजी कॉन्फरन्समध्ये आसूस हा संगणक लॉन्च करू शकते. AnandTech च्या रिपोर्टनुसार, या संगणकाचे दोन व्हेरियंट लॉन्च केलं जाऊ शकतात. Tinker Edge T आणि Tinker Edge R असे या व्हेरियंटचे नाव आहे. रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे की, ‘Tinker Edge T हा NXP i.MX8M आधारित असून, यात Edge TPU चिप देण्यात आली आहे. जी TensorFlow Lite ला गती देण्याचे काम करते. तसेच Tinker Edge R या संगणकात Rockchip RK3399 प्रोसेसर असू शकतो. जो 4K मशीन लर्निंगसाठी NPU सोबत येईल.

672758-asus-tinker-edge-t-single-board-computer

या दोन्ही व्हेरियंटमध्ये इनपुट-आउटपुट पोर्ट्स व्यतिरिक्त अॅक्टिव्ह कुलिंग, यूएसबी 3.0 आणि गिगाबिट ईथरनेट पोर्ट देण्यात आले आहे. आसूसने या डिव्हाइसला हाई-स्पीड एचआय अँड संगणक डिव्हाईस म्हटले आहे. जे कमी पॉवरमध्ये इतर डिव्हाइसपेक्षा अधिक चांगले काम करू शकते. हे डिव्हाइस रिअल टाइममध्ये एआय प्रोसेसिंग करण्यात सक्षम असेल. जे खोलीच्या प्रत्येक भागामध्ये ठेवलेल्या वस्तू आणि लोकांना ओळखण्यात सक्षम असेल. यात एक लहान वाईल्ड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा व्हिविंग अँगल 187 डिग्री आहे.

आपली प्रतिक्रिया द्या