रोबो डॉगने गाजवले AI समिट; व्हायरल व्हिडीओनंतर गलगोटिया विद्यापीठाची सारवासारव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये गलगोटिया विद्यापीठाने त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केलेल्या उत्पादनाच्या रूपात ‘ओरियन’ या चिनी बनावटीच्या रोबोटिक कुत्र्याचे प्रदर्शन केले. त्यावेळी आम्ही हे विकसीत केले, या त्यांच्या दाव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. हा रोबोट युनिट्री गो२ आहे, जो चिनी रोबोटिक्स कंपनी युनिट्रीचा व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेला मॉडेल आहे आणि ऑनलाइन विकला जातो, ज्याची किंमत २ लाख ते ३ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. वाद झाल्यानंतर आम्ही हा विकीसत केला आहे, आम्ही हा बनवला नाही, असे सांगत विद्यापीठाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये रोबोटिक कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते चिनी उत्पादन असल्याचे सगळ्यांना समजले. त्यानंतर यावरून वादाला सुरुवात झाली. गलगोटियास विद्यापीठाने एक निवेदन जारी करून हे उपकरण बनवल्याचा दावा फेटाळून लावला. विद्यापीठाने म्हटले आहे की रोबोटिक कुत्रा युनिट्रीकडून खरेदी करण्यात आला होता आणि तो पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचे साधन म्हणून वापरला जात होता.आता विद्यार्थी त्यावर प्रयोग करून तो विकसीत करत आहे. आम्ही ते विकसीत करत आहोत, आम्ही तो बनवला नाही. आमच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे वाद निर्माण झाल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या स्टॉलवर वीज खंडित झाल्याचे वृत्त आहे. चिनी रोबोटिक कुत्र्याच्या प्रदर्शनामुळे त्यांना एक्स्पो क्षेत्र रिकामे करण्यास सांगण्यात आलेय त्यानंतर तेथील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. गलगोटियास युनिव्हर्सिटीचे अनेक सदस्य त्यांच्या पॅव्हेलियनमध्ये अंधारात उभे असल्याचे दिसून आले आहे. विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने विकसित केलेल्या उत्पादनाच्या रूपात चिनी बनावटीच्या रोबोटिक कुत्र्याचे सादरीकरण केल्याच्या व्हिडिओनंतर नोएडा येथील खाजगी विद्यापीठावर तात्काळ कारवाई करण्यात आली.

सोशल मीडियावर यावर टीका होत आहे. विद्यापीठाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, ते नियमितपणे जगभरातून तांत्रिक प्रगती आणते जेणेकरून ते आपल्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक नवकल्पनांकडे नेऊ शकेल, ज्यामध्ये स्वदेशी क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. विद्यापीठाने असेही आग्रह धरला की त्यांनी कधीही हे उपकरण बनवल्याचा दावा केला नव्हता. मात्र, त्यांच्या प्रतिनिधींनी आम्ही हे विकसीत केले, असा दावा केला होता. गलगोटियासने हा रोबोडॉग बनवला नाही आणि आम्ही तसा दावाही केलेला नाही. मात्र, आमचे विद्यार्थी त्यावर काम करत आहेत. त्यावर ते अशा तंत्रज्ञानाची रचना, अभियांत्रिकी आणि निर्मिती करतील, असे विद्यापीठाच्या निवेदनात म्हटले आहे. आमच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे वाद निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.