कर्नलना मारले तेव्हा सैनिकांनी गोळ्या का नाही झाडल्या? कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी प्रश्न विचारला आहे ‘की जेव्हा धोकेबाज चिन्यांनी आपल्या कर्नलना मारले मारले तेव्हा हिंदुस्थानी सैनिकांनी चिनी सैनिकांवर गोळ्या का झाडल्या नाहीत?तिथे जो दुसरा अधिकारी होता त्याने गोळ्या झाडण्याचे आदेश का दिले नाहीत ?’ मी जर तिथे असतो तर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले असते असं ते म्हणाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सुरुवातीला हिंदुस्थानी जवानांची तुकडी चिन्यांसोबत बातचीत करण्यासाठी गेली होती, तेव्हा तेी निशस्त्र होती असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं, नंतर जवानांकडे शस्त्र होती असं या मंत्रालयाने सांगितलं. जर सैनिक शस्त्र घेऊन गेले होते तर त्यांनी कमांडर गतप्राण झाल्यानंतर शूट अॅट साईटचे आदेश का दिले नाही ? असा सवाल सिंग यांनी विचारला आहे.

इंडिया टुडेशी बोलताना सिंग म्हणाले की आमच्या काळी सैनिकांमध्ये प्रचंड संताप होता. आता आपले सैन्य दल मजबूत झाले आहे आणि आपण कोणत्याही आघआडीवर रोखठोख उत्तर द्यायला सक्षम आहोत. मग जवानांनी आपल्या एका कर्नलच्या तीन चिन्यांना ठार का मारले नाही ? असा सवाल अमरिंदर सिंग यांनी केला आहे. सिंग म्हणाले की चिनी हे धोकेबाज आहेत आणि त्यांनी नेहेमी आपल्याला धोका दिला आहे. 1962 नंतर हिंदी-चिनी भाई-भाईवाले संबंध संपुष्टात आले आहेत असंही ते म्हणाले.

चिनी सैनिक घुसखोरी करत असून गलवानवर आपला दावा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे हे आपल्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याचं सिंग यांचं म्हणणं आहे. हिंदुस्थानने 20 जवान गमावले आहेत आणि पंतप्रधानांचीही काही जबाबदारी असली पाहिजे. 60 वर्षांपासून चीनसोबत बातचीत होत आहे. आपण चीनला धडा शिकवण्यासाठी सज्ज राहायला पाहिजे. जर चीनकडे आण्विक सज्जता आहे, तर आपल्याकडेही ती आहे. आपले सैन्य दल चिन्यांना धडा शिकवण्यासाठी सक्षम आहे असं सिंग म्हणाले.