गणेश मंडळांनी जपली सामाजिक बांधिलकी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भरभरून मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. या संकटापासून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी आता गणेश मंडळे देखील मैदानात उतरली आहेत. शहरातील अनेक गणेश मंडळांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरभरून मदत केली आहे. याशिवाय रक्तदान शिबिरे आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जात आहे.

उत्सवासोबत शहरातील गणेशोत्सव मंडळे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम देखील राबवत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरभरून मदत करण्याचे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले होते. या आवाहनाला शहरातील मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याशिवाय मास्क वाटप, गरजू नागरिकांना धान्य वाटप, रक्तदान शिबीर, विभागात निर्जंतुकीकरण असे उपक्रम देखील मंडळे राबवत आहेत.

देशावर किंवा राज्यावर ज्यावेळी संकट आले त्यावेळी गणेश मंडळांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी गणेश मंडळांनी मुख्यमंत्री सहायता निधीला भरभरून मदत करावी असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी केले

गणेशोत्सव मंडळे आणि त्यांनी केलेली मदत पुढीलप्रमाणे
– लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (मुंबईचा राजा) – 5 लाख
– आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (अंधेरीचा राजा) – 5,01,111
– शिवडी मध्य विभाग गणेशोत्सव मंडळ (शिवडीचा राजा) – 51हजार
– बाल मित्र मंडळ, ग्रँट रोड – 50 हजार रुपये
– वरळीचा महाराजा – 51हजार
– उमरखाडी सार्वजनिक नवरात्री आणि गणेशोत्सव मंडळ – 1 लाख
– आय सी कॉलनी गणेशोत्सव मंडळ, बोरिवली – 25हजार रुपये
– अभ्युदय नगर गणेशोत्सव मंडळ – 1 लाख रुपये