जम्मू कश्मिरमधील गांदरबल येथे जवानांना घेऊन जाणारी बस सिंध नदीत कोसळली, बचावकार्य सुरू

जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात बुधवारी (30 जुलै) सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली. मुसळधार पावसात गांदरबल जिल्ह्यातील कुल्लन येथे इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) जवानांना घेऊन जाणारी बस सिंध नदीत पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील सैनिकांसाठी शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. परंतु अद्याप कोणीही सापडलेले नाही. या घटनेची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध नाही.