इवलेसे डोळे, सुपाएवढे कान, लाडका बाप्पा, घडतोय किती छान! मूर्ती पूर्ण करण्यासाठी कारागीरांची लगबग

गणेशोत्सव अवघ्या 21 दिवसांवर आल्याने सर्वांचा लाडका बाप्पा सध्या गणेश चित्रशाळेत सजत आहे. राजेशाही थाट, उंदीर-चंद्रावरील बैठक, बालगणेश अशा विविध रूपांमध्ये बाप्पाच्या मूर्ती साकारल्या असून कारागीर रात्रंदिवस रंगकामात दंग आहेत.

उच्च न्यायालयाने या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास परवानगी दिल्यामुळे गणेशभक्त आणि मूर्तिकारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सवाचा थाट
आणखीनच वाढणार आहे.

आगमन, विसर्जन मार्ग सज्ज ठेवणार

लालबाग, परळ विभागातील चित्रशाळेतून उत्तुंग मूर्ती शनिवाररविवारचा मुहूर्त साधत मंडपाकडे निघाल्याही आहेत. या पार्श्वभूमीवर मूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचे मार्ग सज्ज ठेवण्याचे निर्देशही यावेळी सकपाळ यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले.

204 कृत्रिम तलाव

गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी पालिकेने आवाहन केले असून शाडूची माती, मूर्तिकारांसाठी जागा एक हजारांवर मूर्तिकारांना देण्यात आली आहे. शिवाय विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सहा फुटांपर्यंतच्या मूर्ती या कृत्रिम तलावांत विसर्जन करणे पालिकेने बंधनकारक केल्याची माहिती गणेशोत्सव समन्वयक उपायुक्त प्रशांत सकपाळ यांनी दिली. पालिकेच्या स्तरावर आज बैठक घेऊन सुविधांचा आढावाही घेण्यात आला.

गणेशोत्सव हा सर्वधर्मीयांमध्ये सलोखा निर्माण करणारा सण आहे. यामुळेच बाप्पाच्या मूर्ती घडवण्याचे काम करण्यासाठी मुस्लिम बांधवही मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत.