हिंदुस्थानातील रेल्वे स्थानके, विशेष ठिकाणांचे व्हिडीओ पाकिस्तानात पाठवायचे; अल्पवयीन मुलांसह टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime Delivery Boy Arrested for Theft

दिल्ली-एनसीआर आणि मुंबईतील रेल्वे स्थानके व सरकारी कार्यालयांचे चित्रीकरण केलेल्या अल्पवयीन मुलासह आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संपूर्ण हिंदुस्थानात कार्यरत असलेला प्रमुख सरदार उर्फ ​​जोरा सिंग याने या तिघांना या नेटवर्कमध्ये ओढले, असे पोलिसांनी सांगितले. या ताज्या पोलीस कारवाईमुळे, ताब्यात असलेल्या संशयितांची संख्या १८ झाली असून, त्यात सहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. रविवारी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची ओळख नौशाद अली (२०), मूळचा बिहारमधील मुझफ्फरपूरचा आणि सध्या फरिदाबादमध्ये राहणारा; मीरा (२८), मथुरेची रहिवासी; आणि एक १७ वर्षीय मुलगा अशी पटली आहे.

यापूर्वी, पोलिसांनी १४ मार्च रोजी सहा जणांना अटक केली होती. पोलिसांनी तपास वाढवल्याने आणखी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. डीसीपी (शहर) धवल जयस्वाल यांनी सांगितले की, नौशाद सुमारे दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे सरदारच्या संपर्कात आला होता.
तपासादरम्यान, आम्हाला त्याच्याशी संबंधित १० पेक्षा जास्त सोशल मीडिया ग्रुप्स आढळले, ज्या प्रत्येकामध्ये ७० ते ८० सदस्य होते. आतापर्यंत, त्याने १५ जणांची भरती केली असावी, असा आमचा विश्वास आहे. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे त्यांनी पुढे सांगितले.

मीराला २४ जुलैला तिला तिच्या मथुरेतील घरातून अटक करण्यात आली, जिथे पाच जण राहतात. ३२ बोअर काडतुसे जप्त करण्यात आली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खानलाही अटक करण्यात आली आणि त्याच्या लपण्याच्या ठिकाणाहून तीन सेमी-ऑटोमॅटिक बंदुका आणि ४.१ लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट ५०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या,” असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी पोलिसांनी नौशाद अली, समीर आणि सोहेल यांना या नेटवर्कमधील प्रमुख सूत्रधार म्हणून ओळखले होते. हे तिघे, यापूर्वी अटक झालेली महक आणि मीरा हे सरदारच्या थेट संपर्कात होते, तर इतर जण कथितरित्या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे दिलेल्या सूचनांनुसार काम करत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी दिल्ली कॅन्ट आणि सोनीपत रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे, सिम-आधारित स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि त्यांचे थेट प्रक्षेपण पाकिस्तानी नंबरवर पाठवले. दिल्ली कॅन्टमधून १४ मार्च रोजी एक कॅमेरा आणि सोनीपतमधून १८ मार्चला दुसरा कॅमेरा जप्त करण्यात आला.