मध्यवर्ती शहरात वाहनांची तोडफोड करणारे टोळके जेरबंद, युनीट एकची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्यादिवशी बुधवार पेठेतील वाहनांची तोडफोड करून नागरिकांना मारहाण करणाऱ्या टोळक्याला युनीट एकने अटक केले. त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. अनुज जितेंद्र यादव वय 19, दक्ष जुबेर गिलानी वय 20 राहुल उर्फ बाबा विनोद बारवासा, वय 23 तिघेही रा. वडगाव शेरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

लक्ष्मी पुजनाच्या दिवशी बुधवार पेठ परिसरात जबरी चोरी करून मोबाईल चोरणारे आरोपी मोबाईल विक्रीसाठी राष्ट्रभुषण चौकीत येणार असल्याची माहिती युनीट एकला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांनी गाड्यांची तोडफोड करून लोकांना मारहाण केल्याची कबुली दिली. आरोपी पैकी राहुल उर्फ बाबा विनोद बारवासा याच्या विरूध्द गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. त्याला फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, उपनिरीक्षक रमेश तापकीर अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, विठ्ठल साळुंखे, अभिनव लडकत, तुषार माळवदकर, निलेश साबळे, दत्ता सोनवणे यांनी केली.

दहशतीसाठी मध्यवर्ती भागात वाहनांची तोडफोड करून नागरिकांचे मोबाइल लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अधिक तपास करण्यात येत आहे.
संदीप भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनीट एक