गॅस 6 रुपये 55 पैशांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lpg-gas

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

घरगुती गॅस (अनुदानित) सिलिंडर साडेसहा रुपयांनी तर विनाअनुदानित गॅस सिलिंडर 133 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तेल कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गृहिणींना मोठाच दिलासा मिळाला आहे.  14 किलो 200 ग्रॅम स्वयंपाकाच्या गॅससाठी (अनुदानित) पूर्वी 507 रुपये 42 पैसे मोजावे लागत होते. हा सिलिंडर आता 500 रुपये 90 पैशांमध्ये मिळेल तर विनाअनुदानित गॅस आता 809 रुपये 50 पैशांत मिळेल.