मुंबईत मलेरिया, गॅस्ट्रोचा मुक्काम; डेंग्यू, चिकुनगुन्याची साथ आटोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना आटोक्यात असला तरी मलेरिया, गॅस्ट्रोची रुग्णसंख्या कायम असल्याचे समोर आले आहे. यामध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या मात्र कमी झाली आहे. मुंबईत 12 डिसेंबरपर्यंत मलेरियाचे 127, गॅस्ट्रोचे 141 तर डेंग्यूचे 21 रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत साथीच्या आजारांची रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने पालिकेचे टेन्शन कायम आहे. मात्र गेल्या महिनाभराचा विचार करता चिकनगुनिया, गॅस्ट्रोची रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि एकाही मृत्यू झाला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. साथीचे आजार आणि डासांपासून होणारे आजार रोखण्यासाठी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये असे आवाहन पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. हे आजार रोखण्यासाठी  पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, दवाखान्यांमधील सर्व यंत्रणा, आरोग्य सुविधा आणि औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

असे आढळले रुग्ण

आजार          नोव्हेंबर        12 डिसेंबरपर्यंत

  • मलेरिया           326              127
  • लेप्टो                 10                 2
  • डेंग्यू                 106             21
  • गॅस्ट्रो                 313           141
  • कावीळ                 37             9
  • चिकुनगुन्या              20             5
  • एच 1 एन 1             1              0