हिमंता बिस्वा सरमा म्हणजे ‘आसामचे जिन्ना’! हिंदू सर्टिफिकेट वाटणे थांबवा; गौरव गोगई संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण तापत आहे. आसाम काँग्रेस अध्यक्ष गौरव गोगोई यांनी भाजप आणि आसामचे मुख्यमंत्री हिमता बिस्वा सरमा यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की, हिमंता बिस्वा सरमा आसामचे जिन्ना आहे. सरमा यांनी हिंदू सर्टिफिकेट देणे थांबवावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गौरव गोगोई यांनी सांगितले की, सत्ताधारी भाजपमध्ये सहभागी होणारे लोकं राजकीय स्वार्थ साधत आहेत. त्यांनी नाव न घेता भूपेन बोरा यांना टोला लगावला आहे.

भाजपमध्ये काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राज्यातील राजवटीत सर्वात भ्रष्ट असलेल्या जुन्या काँग्रेस नेत्यांची भर पडली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बोरा यांना काँग्रेसचे शेवटचे हिंदू नेते म्हटल्यानंतर, गोगोई यांनी आरोप केला की हिमंता बिस्वा सरमा आसामचे जिन्ना आहेत आणि त्यांनी नेत्यांना हिंदू प्रमाणपत्रे देणे बंद करावे. काँग्रेस ही एका महासागरासारखी आहे आणि आपण सर्व त्यात फक्त पाण्याचे थेंब आहोत. आता आसाममध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण तापत आहे.