रत्नागिरीत गौराईचे आगमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

गेले तीन दिवस कोकण गणपती बाप्पामय झाला आहे. तीन दिवस गणपतीबाप्पाची पुजाअर्चा आणि पाहुणचार सुरु असताना आज गौराईचे आगमन झाले. गौराईची आज भक्तीभावाने पुजाअर्चा करण्यात आली. उद्या वाजत गाजत गौरी गणपतींचे विसर्जन होणार आहे. १३ सप्टेंबर रोजी गणपतीबाप्पांचे वाजत गाजत आगमन झाले. रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६५ हजार घरगुती आणि ११० सार्वजनिक गणपतींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. शुक्रवारी दीड दिवसाच्या ९७७४ घरगुती आणि २ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आज गौराईचे वाजत-गाजत आगमन झाले. गौराईला गोडधोड नैवेद्य दाखविण्यात आला. काही ठिकाणी तिखट नैवेद्य दाखविण्यात येतो.