ओव्हल मैदानावर गौतम गंभीर पिच क्युरेटरवर भडकला, पाहा व्हिडीओ

टीम इंडिया व इंग्लंड दरम्यान कसोटी मालिकेतील पाचवा व अंतिम सामना ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला नाही तर ही मालिका इंग्लंड आपल्या खिशात टाकेल. त्यामुळे टीम इंडियासाठी करो की मरो अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे खेळाडू सध्या जोरदार सराव करत आहेत. या सरावादरम्यान मंगळवारी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर व पिच क्युरेटरमध्ये वाद झाला.

29 जुलैला टीम इंडियाचे सराव सत्र सुरू असताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व लंडन ओव्हल मैदानाचे मुख्य क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात वाद झाला. यावेळी गौतम गंभीरने ”आम्ही काय करायचे ते तुम्ही सांगायची गरज नाही” असे त्या पीच क्युरेटरला सांगितले.