डोंबिवलीत दीपावलीनिमित्त गीत रामायणाचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

मराठी संगीतविश्वातलं एक मानाचं पान म्हणजे गदिमांचं गीत रामायण. मराठीतील या अजरामर कलाकृतीविषयी जाणून घेण्याची सुवर्णसंधी डोंबिवलीकरांना मिळणार आहे. डोंबिवली पूर्व येथील डॉ. रघुवीरनगर गणेशोत्सव मंडळ आणि चिन्मय मिशनच्या संयुक्त विद्यमाने गीत रामायणाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक ८ नोव्हेंबर २०१८ रोजी रघुवीर नगर येथील माधवाश्रम हॉल येथे सकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असल्याने रसिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा, असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे.