
रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी हिंदुस्थानसह जगभरातील भक्त अयोध्या नगरीमध्ये दाखल होत आहेत. नुकताच जर्मनीचा एक चिमुकला भक्त अंजनेय हा देखील रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येमध्ये आला होता. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर त्याने आपला अनुभव माध्यमांशी बोलताना सांगितला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक अयोध्येत दाखल होत असतानाच अंजनेयने जर्मनीहून खास रामलल्लाच्या दर्शनासाठी हजेरी लावली. प्रभू श्रीरामाची विलोभनीय मूर्ती पाहिल्यानंतर तो थक्क झाला. याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला की, राम मंदिरातील अनुभव अत्यंत विलक्षण आणि अविस्मरणीय होता. मंदिराची वास्तुकला आणि तेथील आध्यात्मिक वातावरण मनाला स्पर्शून जाणारे आहे.
अयोध्येत सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून कडक ऊन जाणवत आहे. या कडाक्याच्या उन्हाबद्दल बोलताना अंजनेय मजेशीरपणे म्हणाला, येथे खूप उकाडा आहे, पण हा उन्हाळा मी सहन करू शकतो. कारण हे मंदिर आणि रामलल्लाची मूर्ती पाहण्याचा आनंद या उष्णतेपेक्षा खूप मोठा आहे.
#WATCH | Ayodhya, UP: A young devotee, Anjeneya, from Germany, who visited Ram Janmabhoomi Temple recently, says, “My experience at Ram Temple was really good. But it is extremely hot. India is like that, but I can manage the hot season. The temple is really good. It was a really… pic.twitter.com/kmC1HkvpcN
— ANI (@ANI) March 22, 2026
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अंजनेयने व्यक्त केलेले हे प्रांजळ मत सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. देवाच्या भक्तीला सीमा नसते, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओखाली उमटत आहेत.























































