
घाटकोपर येथे आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एका भरधाव दुचाकीस्वाराने 62 वर्षीय वृद्धाला जोरदार धडक दिली आणि स्वतःही रस्त्यावर आदळला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांचाही मृत्यू झाला. अहमदी खान (19), मुझफ्फर शहा (19) आणि सुरेश कराटे (62) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. अहमदी हा दुचाकी चालवत होता तर मुजफ्फर मागे बसला होता.




























































