गिफ्ट कार्डच्या नावाखाली लावला जातोय चुना

803
cyber-crime
प्रातिनिधीक फोटो

लॉक डाऊन काळात कोविड 19, नोकरी, ऑनलाईन खरेदी, वरिष्ठांच्या नावाखाली आणि कर भरण्याचे भासवून बनावट गिफ्ट कार्डच्या लिंक पाठवून चुना लावला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

सायबर भामटे फसवणुकीसाठी नवनवीन आयडिया शोधून काढतात. महाराष्ट्र सायबर ने फसवणुकीचे 5 नवीन ट्रेंड शोधून काढले आहे. ज्याच्या माध्यमातून नागिरिकांना सहज चुना लावला जाऊ शकतो. कोविड 19 च्या नावाखाली एक ईमेल येतो. अमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी केल्यास ती रक्कम कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी वापरली जाईल असे भासवले जाते. बनावट लिंक पाठवून बँक खात्यावर डल्ला मारला जातो. सध्या अनेक जण वर्क प्रॉम होम करतात. घरबसल्या काम करून पैसे मिळवा असा ईमेल पाठवले जातात. गरजू तो ईमेल उघडतात. ईमेलवर आलेल्या लिंकवरून भामटे हे फसवणूक करतात.

त्याचप्रमाणे कार्यालयातील वरिष्ठांच्या नावाखाली ईमेल पाठवला जातो. वरिष्ठांनी गिफ्ट कार्ड खरेदी केले आहे. ती लिंक रिडिम करण्यास सांगून चुना लावला जात असल्याचे महाराष्ट्र सायबरच्या निदर्शनास आले.

आपली प्रतिक्रिया द्या