गळनिंब येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मत्यू

गळनिंबमध्ये घराच्या अंगणात ज्ञानेश्वरी नामदेव मारकड (वय 3 वर्षे) या मुलीला बिबट्याने जखमी केले आहे. ज्ञानेश्वरी आजीबरोबर संध्याकाळी 7.30 वाजता खेळत असताना बिबट्याने आजीच्या हाताला हिसका देत मुलीवर झडप घातली आणि तिला सुमारे 150 फूट उसात ओढत नेले. आजीने आरडाओरड केल्याने गावकरी जमा झाले. त्यामुळे बिबट्याने पळ काढला. जखमी झालेल्या ज्ञानेश्वरीला लोणा येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा रात्री 9 वाजता मृत्यू झाला.

ऑगस्ट महिन्यात याच भागातील पाच वर्षाच्या दर्शन देठे या बालकावर बिबट्याने हल्ला केला होता. त्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलीचा बळी गेला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रमस्थांनी केली आहे. गळनिंब ,कुरणपुर, फत्याबाद, मांडवे, कडीत आदी भागात बिबट्याची दहशत पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या