
विशाखापट्टणमच्या समुद्रात ‘इंटरनॅशनल फ्लिट रिह्यू’ला सुरुवात झाली आहे. या फ्लिट रिह्यूमध्ये जगभरातील 70 हून अधिक देशांतील नौदल सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या 18 देशांतील जहाजे, हिंदुस्थानची 50 हून अधिक जहाजे, हेलिकाॅप्टर, फायटर जेट्सनी वेगवेगळी प्रात्यक्षिके केली. हे सर्व डोळे दिपून टाकणारे होते. विशाखापट्टणमच्या समुद्रात श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात, व्हिएतनाम, म्यानमार, जपान, इराण, ओमान, थायलंड, मालदीव, इंडोनेशिया आणि सेशेल्स देशांच्या नौदलानी आपली ‘पॉवर’ दाखवली.


























































