
प्रसिद्ध ई-मेल अॅप Gmail ने आपल्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर जारी केले आहे. गुगलने यात एक नवीन copy आणि remove बटण जोडले आहे, जे ईमेल कंपॉस करतेवेळी येते. यामुळे आता ई-मेल ऍड्रेस कॉपी आणि पेस्ट करणे सोपे होणार आहे. तसेच आपण येथून ईमेल ऍड्रेस देखील काढू शकता. कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. मात्र अॅपमध्ये हे फीचर अपडेट झाले आहे.
असा करा या फीचरचा वापर
हे नवीन फीचर सर्वात आधी Android Police या वेबसाइटद्वारे स्पॉट करण्यात आले होते. याचा वापर तुम्ही ई-मेल पाठवताना करू शकाल. आपण To सेक्शन लिहिलेल्या ई-मेल ऍड्रेसवर टॅप करताच कॉपी आणि रिमूव्ह असे दोन पर्याय समोर येतील. आधी हे करण्यासाठी लॉन्ग प्रेस करावं लागत होत. हे नवीन अपडेट जीमेलने सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी जारी केले आहे.
Gmail आपल्या वापरकर्त्यांना चांगले आणि सोयीस्कर अनुभव देण्यासाठी वेळोवेळी नवीन फीचर आणत असतो. यापूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये, गुगलने जीमेलमध्ये एक नवीन Contacts टॅब जोडले होते. याद्वारे, वापरकर्त्यांना कोणत्याही कॉन्टॅक्टची माहिती सहज मिळते. यात कॉन्टॅक्टचा फोन नंबर, ईमेल ऍड्रेस, व्यवस्थापक आणि कार्यालय स्थान यासारख्या माहितीचा समावेश आहे.



























































