गो एसएमएस प्रो अॅप वापरताय? वेळीच व्हा सावध

तब्बल 100 मिलियनहून अधिकवेळा डाऊनलोड झालेले लोकप्रिय अँड्रॉइड मेसेजिंग अॅप गो एसएमएस प्रो आता गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले आहे. गो एसएमएस प्रो या अॅपमध्ये सुरक्षेच्या बाबतीत काही गंभीर उणीवा असल्याच्या तक्रारी युजर्सकडून मिळाल्यानंतर गुगलने ही कारवाई केली आहे. या अॅपमध्ये युजर्सकडून पाठवलेले पह्टो, व्हिडिओ आणि अन्य फाइल्सला हॅकर्सकडून सहज अॅक्सेस करणे शक्य होत होते. हे अॅप मेसेजिंगदरम्यान एक लिंक तयार करते. त्या लिंकद्वारे हॅकर युजरच्या फोनचा अॅक्सेस मिळवायचे. युजर्सना मात्र या लिंकबाबत काहीही माहिती नव्हती. ट्रस्टवेअरने गो एसएमएस प्रोच्या 7.91 व्हर्जनमधील या त्रुटी सर्वांसमोर आणल्या होत्या. या अॅपद्वारे हॅकर्स सहजपणे युजरच्या खासगी मेसेज, पह्टो आणि व्हिडिओपर्यंत पोहोचू शकतात असे ट्रस्टवेवने म्हटले होते. या त्रूटी दूर करण्यासाठी डेव्हलपर्सना 90 दिवसांचा वेळ देऊनही त्रूटी दूर न झाल्याने ही कारवाई झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या