लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्याची मागणी

881

देशभरात सुरू असलेला लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढवण्यात आला आणि तो 31 मेपर्यंत लागू राहील असे जाहीर करण्यात आले होते. लॉकडाऊनबाबत पुढचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी लॉकडाऊनचा आणखी वाढवावा अशी मागणी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधला असता सावंत यांनी लॉकडाऊनचा कालावधी 15 दिवसांनी वाढवावा अशी मागणी केली. गोवा हे काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त राज्य होतं. मात्र सध्या तिथे कोरोनाचे 68 रुग्ण सापडले आहेत. यामुळे सावंत यांनी ही मागणी केली आहे. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढवत असताना हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशीही मागणी सावंत यांनी केली आहे. हॉचेलमध्ये 50 टक्के लोकांनाच परवानगी द्यावी आणि ती सुरु करावी अशी मागणी सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.

गोव्यामध्ये पर्यटकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. गोव्याबाहेरून कोणाला यायचे असेल तर त्याला कोरोना झाला नसल्याचे सर्टिफिकेट घेऊन यावे लागते आहे. ते नसल्यास गोव्यामध्ये आल्यानंतर त्याची चाचणी केली जात आहे. हिंदुस्थानात आतापर्यंत 1 लाख 66 हजार कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्यातील 4706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या