मतदानासाठी गोवा सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी होणाऱया निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोग सतर्क असून जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात असून मतदार कोणाला आपला व्हेलेंटाइन ठरवतात याचे उत्तर 10 मार्च रोजी मिळणार आहे.द्या होणाऱया निवडणुकीसाठी 11 लाख 64 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 8 मतदान केंद्रांची जबाबदारी दिव्यांग कर्मचारी तर 105 मतदान केंद्राची जबाबदारी महिला सांभाळणार आहेत.

निवडणुकीदरम्यान कोणताही चुकीचा प्रकार किंवा गुन्हे घडू नयेत यासाठी 81 फ्लाईंग स्कॉड त्याचबरोबर स्थानिक सर्व्हिलन्स टीम आणि गोवा पोलीस तैनात ठेवले आहेत. दुसरीकडे ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा लोकांच्या याद्या तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारचे गुन्हे नोंद असलेल्यांवर निवडणूक आयोग कडक लक्ष ठेवून आहे. निवडणूक शांततेत, कोणताही गैरप्रकार न होता पार पडावी यासाठी केंद्र सैनिक बल, गोवा पोलीस प्रशासन संपूर्णपणे सतर्क आहे.