
शेअर बाजाराचा परिणाम देशातील सोन्याच्या किंमतीवर आणि सराफा बाजारावरही होत असतो. गेल्या काही दिवसापासून शेअर बाजारात चढउतार होत असल्याने सोन्याच्या किंमतीतही बदल होत आहोत. अधिक मासात सोन्याचे दर चढेच होते. आता श्रावण महिना सुरु झाल्याने सोन्याच्या दरात घसरण होत ते सव्वा महिन्याच्या नीचांकी पातळीवर आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन 60 हजार रुपये प्रती 10 ग्रॅम दरावर होते. आता ते सव्वा महिन्याच्या नीचांकीवर आले आहे. अधिक मासामुळे सोने-चांदीच्या भावात वाढ झाली होती. आता तीन दिवसांपासून सोने 58 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहेत. चांदीच्या किंमतीतही चढ-उतार होत आहेत. सध्या चांदी 71 हजार रुपये प्रतिकिलोवर आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत ते 60 हजारांपर्यंत पोहचले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढल्याने भाववाढ तर होतच होती, शिवाय अधिक मास सुरू झाल्याने सोने-चांदीला मागणी वाढली होती. त्यामुळे मध्यंतरी सोने 60 हजारांच्याही पुढे गेले. मात्र, अधिक महिना संपल्यानंतर सोन्याचे भाव कमी होऊन गेल्या तीन दिवसांपासून ते 58 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले आहे.
चांदीचे दर 71 हजार 200 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. 19 रोजी त्यात पुन्हा 200 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव कमी झाले. तसेच आपल्याकडे अधिक मास संपल्याने मागणीवर परिणाम झाल्यानेही भाव कमी होत आहे. आगमी काळात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिवाळी आणि लग्नसराई सुरू झाल्यावर सोन्याच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे त्या काळात दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
























































