औषधाच्या कॅप्सूलमधून सोन्याची तस्करी, 20 लाखांचे सोने जप्त

394
gold-capsule

दुबईतून औषधी कॅप्सूलमध्ये सोन्याची भुकटी घेऊन आलेल्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) लोहगाव विमानतळावर पकडले. तिच्याकडून 642 ग्रॅम वजनाचे 19 लाख 98 हजारांचे सोने जप्त केले.

मरिअम मोहम्मद सलीम शेख असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मरिअम ही मुळची मुंबईची राहणारी आहे. तस्करीचे सोने मरिअम कोणाला देणार होती, यादृष्टीने तपास सुरू आहे, अशी माहिती कस्टमच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली.

लोहगाव आंतराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे चारच्या सुमारास दुबईहून विमान उतरले होते. त्यावेळी शेख विमानतळावरून गडबडीत बाहेर पडण्याचा प्रयत्नात होती. संशयावरुन तिला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे असलेल्या साहित्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्याकडे काही औषधी गोळ्या (कॅप्सुल) सापडल्या. गोळ्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा गोळ्यांमधील अंतर्गत भागात सोन्याची भुकटी लपविल्याचे उघडकीस आले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची भुकटीची किंमत 19 लाख 98 हजार 138 रुपये आहे. सहआयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या