सोने 11 वर्षांत 200 टक्क्यांनी महागले

हिंदुस्थानात सोने खरेदीला वर्षानुवर्षे मागणी आहे. सोने लाखांच्या घरात गेले असतानाही काल अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देशभरातील सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. सोने हे एक गुंतवणुकीसाठीसुद्धा चांगला पर्याय आहे. सोने गेल्या 11 वर्षांत म्हणजेच 2014 ते 2025 या काळात तब्बल 200 टक्क्यांनी महाग झाल्याचे समोर आले आहे. 2014 साली सोने 30 हजार रुपये तोळा होते. 10 मे 2024 पासून सोन्याच्या किमतीत तब्बल 30 टक्के वाढ झाली आहे.

24 कॅरेट सोने

2014 – 30,182 रु. प्रति तोळा
2015 – 26,936 रु. प्रति तोळा
2016 – 29,805 रु. प्रति तोळा
2017 – 28,873 रु. प्रति तोळा
2018 – 31,534 रु. प्रति तोळा
2019 – 31,729 रु. प्रति तोळा
2020 – 46,552 रु. प्रति तोळा
2021 – 47,676 रु. प्रति तोळा
2022 – 50,808 रु. प्रति तोळा
2023 – 59,845 रु. प्रति तोळा
2024 – 73,240 रु. प्रति तोळा
2025 – 95,900 रु. प्रति तोळा

22 एप्रिल 2025 रोजी सोने पहिल्यांदा एक तोळ्यासाठी एक लाखाच्या पार गेले होते.