
सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याच्या दरात वाढ होऊन तो 65 हजार रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. सोन्याच्या दरात दोन दिवसांत तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीही काही मागे राहिलेली नाही. चांदीचा भाव प्रतिकिलो 74 हजार 900 रुपयांपर्यंत पोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने सोन्या-चांदीच्या विक्रमी दरवाढीबाबत माहिती दिली आहे. दरवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने 2110 डॉलर प्रति औंस झाले आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने जूनमध्ये व्याजदरात कपातीची शक्यता व्यक्त केल्याने सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.























































