Gold Silver Rate – सोने-चांदीच्या दरात अस्थिरता; घसरणीनंतर वाढले भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराणमधील युद्धामुळे जागतिक शेअर बाजारासह सोनेचांदीच्या दरातही चढउतार होत आहेत. फेबुरवारी आणि मार्च महिन्यात सोनेचांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. सोनेचांदी त्यांच्या उच्च्यांकापेक्षा स्वस्त मिळत आहे. त्यामुळे खेरदीदारांसाठी हा मोठा दिलासा आहे. तर सोनेचांदीतील या चढउतारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.

सोने आणि चांदीच्या दरांमधील घसरण थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अमेरिका-इराण युद्धामुळे वाढलेल्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवरही, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती वाढण्याऐवजी घसरत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर व्यवहार सुरू होताच त्यांच्या किमती घसरल्या. चांदीच्या किमती एकाच झटक्यात 2,100 पेक्षा जास्त घसरल्या, तर 10 ग्रॅम 24-कॅरेट सोन्याचा दर 3,000 पेक्षा जास्त घसरला. या ताज्या घसरणीनंतर चांदी आता तिच्या सर्वोच्च किमतीच्या निम्म्या दरात उपलब्ध आहे.

या घसरणीनंतर सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सोन्याच्या दरात 812 रुपयांची वाढ होत ते 1,48,083 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीच्या दरात 2196 रुपयांची वाढ होत ते 230150 रुपयांवर व्यवहार करत होते.

वायदे बाजारात (एमसीएक्स) सोमवारी व्यवहाराला सुरुवात होताच सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. या घसरणीनंतर चांदी आता तिच्या सर्वोच्च दरापेक्षा प्रति किलो ₹2.13 लाखांपेक्षा जास्त स्वस्त झाली आहे. अमेरिका-इराण युद्धात सोन्याची चमक आणि झळाळी वाढण्याऐवजी ती ओसरत आहे. गेल्या शुक्रवारी 24-कॅरेट सोन्याची किंमत MCX वर ₹1,47,255 वर बंद झाली होती. तथापि, सोमवारी व्यवहार सुरू होताच, ती 3,043 ने घसरून प्रति 10 ग्रॅम ₹1,44,212 वर आली. त्यानंतर त्याच्यात वाढ झाली.

उच्च पातळीशी तुलना केल्यास, सोन्याचा आतापर्यंतचा उच्चांकी वायदा भाव प्रति १० ग्रॅम २,०२,९८४ रुपये होता आणि या पातळीवर ते ५८,७७२ रुपयांनी स्वस्त झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या (US-Iran War) सुरुवातीपासून झालेल्या घसरणीबद्दल बोलायचे झाल्यास, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले आणि त्याच्या एक दिवस आधी, एमसीएक्स (MCX) सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६५,६५९ रुपये होता, या पातळीवरून तो आता २१,४४७ रुपयांनी कमी झाला आहे.

चांदीचा भावही सातत्याने घसरत आहे. इराण युद्धानंतरच ती स्वस्त झाली आहे. सोमवारी बाजार उघडताच, एमसीएक्सवर (MCX) ५ मे रोजी मुदत संपणाऱ्या चांदीचा भाव, गेल्या आठवड्यातील शेवटचा व्यवहार दिवस असलेल्या शुक्रवारच्या २,२७,९५४ च्या तुलनेत २,१५७ ने घसरून २,२५,७९७ प्रति किलो झाला. परिणामी, युद्ध सुरू होण्यापूर्वी, २७ फेब्रुवारी रोजीच्या ₹२,८२,६४४ या भावाच्या तुलनेत ती ५६,८४७ प्रति किलोने स्वस्त झाली आहे. मात्र, व्यवहार सुरू होताच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.