सोन्या-चांदीचे भावात घसरण, सोन्याचा दर 50 हजार तर चांदी 700 रुपयांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या देशात लग्नसराईची धूम आहे. त्यामुळे सराफा बाजारात देखील गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सोने चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोने चांदीच्या दरात आज घट झाली आहे.

हिंदुस्थानी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. हिंदुस्थानी बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 1 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा दर सुरुवातीच्या व्यवहारात 0.57 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर आज चांदीचा दर 1.22 टक्क्यांनी घसरला आहे.

गुरुवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 9.05 वाजता 286 रुपयांनी घसरुन 50, 320 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्यामुळे सोन्याचा आजचा भाव 50 हजार 500 रुपयांवर उघडला गेला. त्यानंतर मार्केट भाव 50, 280 रुपयांपर्यंत गेला. पण काही काळाने भाव सावरत पुन्हा 50 हजार 320 वर आला. काल सोन्याचा भाव 0.26 टक्क्यांनी बंद झाला होता. मल्टी कमोडीटी एक्स्चेंजवर आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर आज 716 रुपयांनी घसरला असून 58 हजार 074 रुपये झाला आहे. चांदीचा भाव 58 हजार 441 रुपयांवर आला होता

नवी दिल्लीच्या सराफा मार्केटमध्ये सोन्याचा दर बुधवारी 51 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम वाढला आहे. चांदीचा भाव 502 रुपये प्रति किलोग्रॅम झाला होता. सोन्याचा भाव 51 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढून 50 हजार 964 रुपये झाला आहे. मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोनं 50 हजार 913 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदीची किंमतीत 2 नोव्हेंबरला 502 रुपयांनी घसरुन 59 हजार 265 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले होते.