
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहेत. जागतिक अनिश्चितता, अमेरिकन टॅरिफ पॉलिसी आणि इतर घटक बाजारपेठेत सतत बदल घडवत आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोनेचांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर सोने-चांदीचे दर दबावाखाली आहेत. अजूनही ते त्यांच्या उच्चांकापासून कमी किमतीत मिळत आहे. मात्र, बदलत्या जागतिक परिस्थितीत सोने-चांदीचे दर पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारातूल घडामोडींमुळे सोन्याचांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जेपी मॉर्गनने २०२६ च्या अखेरीस प्रति औंस $६,३०० चा पूर्वीचा अंदाज कायम ठेवत त्यांचे मध्यकालीन किमतीचे लक्ष्य $४,५०० प्रति औंस पर्यंत वाढवले आहे. जेपी मॉर्गनच्या मते गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हरिसफिकेशनचा ट्रेंड सुरू आहे, ज्यामुळे सोन्याची वाढ सुरू राहू शकते.
सोने-चांदी शुक्रवारी वायदे बाजारात तेजीमध्ये बंद झाले. वायदे बाजारात सोन्याचे दर 1,62,104 रुपयांवर बंद झाले. तर चांदीचे दर 2,82,644 रुपयांवर बंद झाले. मुंबईत १० ग्रॅम चांदी २,९५० रुपयांना विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २९,५०० रुपये खर्च करावे लागतील. आता अमेरिका- इराण यांच्यात युद्ध सुरु झाल्याने सोमवारी वायदे बाजारात सोनेचांदीच्या किमती उसळी घेण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
२४ कॅरेट – १,६४,७३०
२२ कॅरेट – १,५१,०००
१८ कॅरेट – १,२३,५५०

























































