सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, एक तोळ्याचा भाव 50 हजारांवर जाण्याचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता देण्यात येत असून यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. यामुळे एवढ्या दिवस ठप्प असलेली बाजारपेठ पुन्हा सुरू झाली असून लग्नसराईसाठी लोक जोरात खरेदी करत आहेत. याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत आहे. आज गुरुवारीही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली.

गुरुवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 425 रुपयांनी वाढला. यामुळे ग्राहकाला आता 10 ग्राम सोन्यासाठी 47 हजार 430 रुपये मोजावे लागणार आहेत. 23 कॅरेट सोन्याचा दर 423 रुपयांनी वाढला असून आता एक तोळ्याचा नवीन दर 47 हजार 240 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोने 43 हजार 446 रुपये प्रति तोळा विकले जात आहे. सोन्यासह चांदीचा दरही वाढला असून प्रति एक किलोमागे 575 रुपयांची वाढ होऊन तो 48 हजार 395 रुपये झाला आहे.

gold-rate4

सोने-चांदी 50 हजार गाठणार
जगभरात लॉकडाऊन हळूहळू ओपन होऊ लागले आहे. त्यामुळे सोन्याची मागणीही वाढण्याची शक्यता असून येत्या काळात सोने-चांदीचा दर 50 हजारांचा आकडा गाठू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

gold

लग्नसराईत मागणी वाढणार
लॉकडाऊनमुळे रखडलेले व्यवहार आणि लांबणीवर पडलेले लग्न सुरू झाले आहेत. या काळात लोक सोन्यावर आधील गुंतवणूक करण्याची शक्यता असल्याने मागणी वाढू शकते.