
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, शेअर बाजार कोसळल्याने आणि कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरांनी जबरदस्त उसळी घेतली. इंडियन बुलियन एंड ज्वेलर्स असोसियशनच्या माहितीनुसार दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा 535 रुपयांनी वधारला, तर चांदीचा भावही प्रतिकिलो 995 रुपये वर गेला.

शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा दर प्रतितोळा 40153 रुपये होते. सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दराचा आलेख चढता राहिला. 999 हॉलमार्क सोन्याचा भाव प्रतितोळा 40962 रुपयांवर पोहोचला, तर एक किलो चांदीचा भाव 47140 रुपयांवर पोहोचला. आगामी काळातील लग्नसराई आणि सणवार पाहता हा दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सोन्या-चांदीचे भाव
- 999 हॉलमार्क सोन्याचा प्रतितोळा दर शुक्रवारी 40153 रुपये होता, तर सोमवारी हा दर 40962 रुपये झाला.
- 995 हॉलमार्क सोन्याचा प्रतितोळा दर शुक्रवारी 39996 रुपये होता, तर सोमवारी हा दर 40529 रुपये झाला.
- 916 हॉलमार्क सोन्याचा प्रतितोळा दर शुक्रवारी 36784 रुपये होता, तर सोमवारी हा दर 37274 रुपये झाला.
- 999 हॉलमार्क चांदीचा प्रतिकिलो दर शुक्रवारी 46145 रुपये होता, तर सोमवारी हा दर 47140 रुपये झाला.
कच्च्या तेलाच्या किंमती कोसळल्या

अमेरिका आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती चांगल्या वाढल्या होत्या. परंतु हा वाद आता निवळल्याचे चिन्ह असून कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. कच्च्या तेलाचा किंमती प्रति बॅलरमागे 83 रुपयांनी खाली आल्या असून सध्या 3790 रुपयांवर स्थिरावल्या आहेत.




























































