महाराष्ट्रामध्ये ‘ब्लॅक पँथर’ दिसल्यानंतर देशातील एकमेव ‘सुवर्ण’ वाघही कॅमेऱ्यात कैद, पहा त्याचा रुबाब

4087

दुर्मिळ वन्य प्राण्यांपैकी एक आणि वेगळ्या रुबाबाचा ‘बगीरा’ अर्थात ब्लॅक पँथरचे (बिबट्या) संगमेश्‍वर तालुक्यातील कोंडीवरे येथे दर्शन झाले होते. यानंतर आता देशातील अत्यंत दुर्मिळ समजला जाणाऱ्या ‘गोल्डन’ वाघाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयएफएस परवीन कासवान यांनी हे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

परवीन कासवान यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये वाघाचा रुबाब आणि सौंदर्य दिसत आहे. 21 व्या शतकातील हा असा एकमेव वाघ (फिमेल) आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कासवान ट्विटमध्ये म्हणतात, ‘तुम्हाला माहिती आहे का देशात एक सोनेरी वाघ देखील आहे. 21 व्या शतकातील हा एकमेव गोल्डन वाघ आहे. याचे सौंदर्य न्याहाळण्यासारखे आहे.’ दरम्यान, हे फोटो आसाममधील काझीरंगा अभयारण्यमधील असून फोटोग्राफर मयुरेश हेंद्र यांनी क्लिक केलेले आहेत.

दरम्यान, या ट्विटखाली अनेकांनी रिप्लाय दिला आहे. रामायणात सुवर्ण मृगाचा उल्लेख आपण ऐकला आहे, मात्र सुवर्ण वाघ पहिल्यांदा पाहिल्याचा प्रतिक्रिया मिळत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या