
मायक्रोसॉफ्टने अलीकडेच तब्बल 6 हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. त्यापैकी सॉफ्टवेअर अभियंत्यांनी बनवलेल्या एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलीजन्सने त्यांच्याच नोकऱ्या गिळल्या. त्यामुळे आता गुगलचे डीपमाईंड सीईओ डेमिस हासाबिस यांनी एआय शिका, नाहीतर नोकऱ्या जातील असा इशारा दिला आहे. एआय ही तुमच्या पिढीची निर्णायक क्रांती ठरणार आहे. त्यामुळे यात आताच पारंगत व्हा, अन्यथा मागे पडाल, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला आहे.
गुगल डीपमाईंड या अत्याधुनिक संशोधन संस्थेमार्फत पंपनीचे जनरेटीव्ह एआय मॉडेल जेमिनी आणि एजीआय अर्थात आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सच्या दिशेने संशोधन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एआयमध्ये पारंगत होण्याचा सल्ला डेमिस हासाबिस यांनी तरुणांना दिला आहे. अलीकडेच गुगल आय/ ओ परिषदेत बोलताना आणि हार्प पर्ह्प लोकप्रिय पॉडकास्टवर संवाद साधताना त्यांनी पुढील पाच ते दहा वर्षांत एआयमुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कमी होणार असून पारंपरिक नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचा दावा केला, परंतु एआयमुळे अधिक नवीन, अधिक मूल्यवान आणि रंजक संधीही निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
एआय निंजा बना
इंटरनेटने मिलेनियल्स आणि स्मार्टपह्नने जेन झेड पिढी घडवली. त्याचप्रमाणे जनरेटीव्ह एआय ही जेन अल्फाची नवी ओळख बनणार असल्याचे डेमिस म्हणाले. केवळ एआय वापरकर्ते बनू नका, तर एआयममध्ये सखोल ज्ञान असलेले एआय निंजा बना, असा सल्लाही डेमिस यांनी तरुणांना दिला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांची भक्कम तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
तांत्रिक कौशल्यावर भर नको
केवळ तांत्रिक कौशल्यावर भर न देता मेटा स्किल्स विकसित करण्याचे महत्त्वदेखील त्यांनी तरुणांना पटवून दिले. सध्याच्या घडीला तंत्रज्ञानाचा वेग पाहता अनेक गोष्टी एआयच्या माध्यमातून करून घेतल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन ज्ञान वाढवण्याची आणि नवनवीन टूल्सवर काम करण्याची गरज असल्याचे डेमिस हासाबिस यांनी म्हटले आहे.