
गुगलने अलीकडेच ‘गुगल फॉर इंडिया इव्हेंट’मध्ये अनेक टॉप फीचर लाँच केले आहेत. आपल्या इंटरनेट युजर्सला अधिक सुरक्षित करण्यासाठी गुगलने अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये हे फीचर आणले आहेत. गुगलने आठ भाषांमध्ये ‘गुगल तो अपना है’ ही मोहीम सुरु केली असून त्यामध्ये युजर्सना स्पॅमस्टर, फिशिंग वेबसाईट्स आणि इतर ऑनलाईन जोखमींबाबत माहिती देण्यात येणार आहे.
गुगलने आपल्या ‘बी इंटरनेट ऑसम’ या अभियानाच्या माध्यमातून लहान मुलांना ऑनलाईन सुरक्षेबाबत सजग करण्याचे ठरवले आहे. सध्या ही मोहीम इंग्रजी आणि हिंदीमध्ये असून लवकरच ती अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेतून पालक आणि शिक्षकांनाही माहिती देण्यात येणार आहे. गुगलने क्रोम ब्राऊझरमध्ये अपडेट आणून अनेक प्रायव्हसी टुलची घोषणा केली आहे. याशिवाय अॅड्रॉईड 12 मध्ये सुरक्षा आणि प्रायव्हसीवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.























































