गुगल आता उच्चारही करायला शिकवणार, वाचा नव्याकोऱ्या फिचरबद्दलची सविस्तर बातमी

1167

जगभरातील असंख्य लोकं गुगलचा विविध माहिती मिळवण्यासाठी वापर करत असतात. लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गुगल सातत्याने नवीन फिचर्स आणत असते. गुगलने आता लोकांना शब्दांचा उच्चार योग्य पद्धतीने कसा करावा आहे हे शिकवण्यासाठी नवीन फिचर आणलं आहे.

अँड्रॉईड फोनमध्ये गुगल असिस्टंटचा पर्याय दिला आहे. त्यामध्ये किंवा गुगल सर्चमध्ये एखादा शब्द भरल्यास आपल्याला त्या शब्दाबद्दलची अधिक माहिती मिळते. याशिवाय तो शब्द कसा उच्चारला जातो याचा आवाजही ऐकता येतो. मात्र तुम्हाला हा उच्चार नीट करता येतो का हे जाणून घेण्यासाठी आतापर्यंत गुगलने साधन उपलब्ध करून दिलं नव्हतं. नव्या फिचरमध्ये हीच गोष्ट गुगलने उपलब्ध करून दिली आहे. ज्या शब्दाचा उच्चार तुम्हाला नीट करता येत नाही तो शब्द तुम्ही मोबाईलच्या माईकच्या सहाय्याने गुगलला ऐकवू शकता. तुमचा उच्चार ऐकून गुगल तो उच्चार बरोबर आहे की नाही हे सांगेल. जर उच्चार नीट नसेल तर तो नीट कसा करता येईल याबाबतचा सल्लाही गुगल देईल. सध्या हे फिचर फक्त इंग्रजी भाषेपुरता मर्यादीत आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये भाषांची संख्या वाढवली जाणार आहे.

हे नवं फिचर सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलं असून सध्या हे फक्त मोबाईलपुरता मर्यादीत आहे. यामध्ये सुधारणेचं काम सुरू असून त्यामध्ये आणखी काही पर्याय जोडण्याचेही प्रयत्न सरू आहेत. गुगलने भाषांतर आणि संज्ञा या फिचरमध्येही काही सुधारणा केल्या आहेत. यापुढे तुम्हा एखाद्या वाक्याचं किंवा शब्दाचं भाषांतर विचारल्यास गुगल त्याचे उत्तर देईलच शिवाय त्यासंदर्भातील काही फोटोही तुमच्यासमोर मांडेल. हे फिचरदेखील सध्या फक्त इंग्रजी भाषेपुरता मर्यादीत आहे

आपली प्रतिक्रिया द्या