सावधान! गुगलने 813 अ‍ॅप प्ले स्टोअर वरून हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हेरगिरी करणारे शेकडो अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर वरून हटवण्यात आले आहेत. अशा प्रकारचे अ‍ॅप हे ‘क्रिपवेअर’ म्हणून ओळखले जातात. लाखोंच्या संख्येने डाउनलोड करण्यात आलेले हे अ‍ॅप हॅकर्स ऑपरेट करत असल्याचे उघड झाल्यावर गुगलकडून हे पाऊल उचलण्यात आले. तब्बल 813 अ‍ॅप प्ले स्टोअर वरून हटवण्यात आले आहेत.

‘क्रिपवेअर’ अ‍ॅप काय करतात?

हॅकर्स हे ‘क्रिपवेअर अ‍ॅप’ हेरगिरीसाठी वापरतात. माहिती चोरणे, धमकवणे, फसवणूक करणे असे प्रकार या अ‍ॅपद्वारे करण्यात येतात. या अ‍ॅपद्वारे ऑनलाईन पासवर्ड चोरण्यासारख्या घटनाही घडतात. माहितीचा गैरवापर करून लोकांना लुटले जाते.

अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर फोन मधील गॅलरी, व्हॉइस, व्हिडीओ, कॅमेरा, फोल्डर याचे अ‍ॅक्सेस हॅकर्सना मिळतात. अशा अ‍ॅपद्वारे हॅकर्स तुमच्या फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात, अशी माहिती नोर्टन अँटी व्हायरसकडून देण्यात आली आहे.